लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सासरवाडीमध्ये जावायाला मोठे मान असते , शिवाय जावायाचे सर्व लाड सासऱ्याकडून पुर्ण करण्यात येत असतात . अशातच जावयाने सासऱ्याच्या संपत्तीमध्ये किती अधिकार असतो , त्यावर जावई हक्क गाजवतात का ? नेमका उच्च न्यायालयाने काय निकाल दिला , सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वडिलांच्या संपत्तीमध्ये मुल हस्तक्षेप करत असतात त्या कायदेशिर अधिकार देखिल आहे , वारसांने मिळालेली संपत्तीमध्ये देखिल कुटुंबातील सर्व सदस्यांचा अधिकार असतो . परंतु वडिलांने त्यांने कमावलेली किंवा वारसांनी प्राप्त केलेली संपत्ती विकण्याचा किंवा एखाद्या मुलांच्या नावे करण्याचा अधिकार देखिल आहे . अशा प्रकरणी दुसरे मुलं कायदेशिर लढाई लढु शकत नाहीत .
केरळ राज्यातील हेंद्रीने आपला जावई डेविहस विरुद्ध पयन्नूर येथील कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला होता . या कनिष्ठ न्यायालयात जावई डेव्हिसला सासरा हेंद्रीच्या संपत्तीमध्ये हस्तक्षेप करण्यास आणि त्यांच्या परिसरात कायची बंदी घालण्याची विनंती हेन्डरी ( सासरा ) ने न्यायालयात केली .ही संपत्ती आपल्याला जेम्स नाझरेथ आणि पॉल चर्चकडून भेट मिळाली असल्याचा दावा केला .या संपत्तीवर हेन्द्रीने आपले पक्के घर बांधले आहे , तशी त्यांची संपत्ती चांगलीच आहे .
यामुळे हेंद्रीने आपल्या एकुलत्या मुलीचा विवाह डेव्हिस सोबत केला , एका प्रकारे हेंद्रीने डेव्हिसला दत्तक घेतले यामुळे यामुळे डेव्हिसने आपणही सासऱ्याच्या संपत्तीवर वारस असल्याचे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली . यावर केरळ उच्च न्यायालयोन दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून असा निकाल दिला आहे कि , जावई हा कुटुबातील सदस्य असू शकत नाही . डेव्हिसने हेंद्रीच्या मुलींसोबत लग्न केल्यामुळे मुलींच्या वडीलांच्या संपत्तीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही .या संपत्तीवर हेंद्रीची मुलगी हक्क सांगू शकेल , पण जावई हक्क गाजवू शकणार नाही असा महत्वपुर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे .