Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Pensioners Big News ] : पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना आत्ताची घडीची अत्यंत महत्वपुर्ण बातमी समोर येत आहे , जर पेन्शनधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्यास डिसेंबर महिन्यांपासून पेन्शन बंद होवू शकते . ती म्हणजे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्राचा दाखला विहीत कालावधीमध्ये सादर करावा लागणार आहे . जीवन प्रमाणपत्र कशा पद्धतीने सादर कराता येईल व कोठे सादर करावा याबाबतची सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .

निवृत्तीवेतन धारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी 30 नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावा लागतो , यासाठी शासनांने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अनेक प्रर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . जर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास , पेन्शनधारकांची पेन्शन बंद होते .यासाठी पेन्शनधारकांना / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना पुढील पर्यायांचा वापर करुन जीवन प्रमाणपत्र सादर करावेत लागणार आहेत .

यांमध्ये आपले पेन्शन खाते असणाऱ्या बँक शाखेमध्ये बँक शाखा व्यवस्थापकाच्या समोर  प्रत्यक्ष हजर राहून आपल्या नावाच्या समोर स्वाक्षरी / अंगठ्याचे ठसे देवून जीवन प्रमाणपत्र सादर करु शकता .यांमध्ये पेन्शनधारकांनी आपले अद्यावत आधार नंबर , मोबाईल नंबर , पॅन कार्डची नोंदी करणे आवश्यक असणार आहेत .

याशिवाय पेन्शनधारक ऑनलाईन पद्धतीने http://jeevanpranam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे लागणार आहेत . त्याचबरोबर आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयांशी संपर्क साधून जीवन प्रमपणपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे .

याशिवाय दिनांक ज्यांचे निवृत्तीवेतन वार्षिंक 7 लाखांपेक्षा अधिक आहे , अशांनी दिनांक 31 डिसेंबर 2023 पुर्वी आयकर कपात प्रणाली लागु करणेबाबतचे घोषणापत्र सादर करावेत लागणार आहेत . यानुसार पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र विहीत मुदतीमध्ये जमा न केल्यास त्यांची पेन्शन डिसेंबर महिन्यांपासून बंद होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *