Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer Shasan Paripatrak ] : ग्रामविकास विभागांकडून बदली संदर्भात दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहेत , सदर परीपत्राकानुसार , बिंदुनामावली तपासणी व तद्नुषंगाने आंतरजिल्हा संदर्भात पत्र Vinsys It Service Pvt Ltd कंपनीस सादर करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार दिनांक 13.09.2023 च्या शासन पत्रानुसार , सन 2022 मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते , परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते . मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती , अशा सन 2022 च्या बदली प्रक्रियेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरु करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच शालेय शिक्षण विभागाने दिनांक 21 जून 2023 च्या शासन निर्णयान्वये सन 2022 मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही , अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकानी अर्ज केले होते , परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती ,
फक्त अशाच सन 2022 च्या बदली प्रक्रियेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्याबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली तयार करण्याची तयार करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत दिनांक 09 ऑक्टोंबर 2023 रोजी झालेल्या Video Confrance मध्ये संचालक शालेय शिक्षण यांनी सर्व जिल्हा परिषदा यांना आदेशित केले आहेत .त्यानुसारच सदर बिंदुनामावली पुर्ण करुन मंजुर करण्यात आलेली बिंदुनामवली बदली पोर्टल वर अपलोड करण्याची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी कोणत्याही परिस्थितीत दिनांक 28 ऑक्टोंबर 2023 ते दिनांक 29 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये पुर्ण करावेत , असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
अशा सुचना दिनांक 27.10.2023 रोजीच्या पत्रान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत , तरी त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली विहीत मुदतीत अपलोड केल्याची खात्री करुन सन 2022 ची जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबतची कार्यवाही दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पासून सुरु करण्यात यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे .
या संदर्भात ग्रामविकास विभगांकडून दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.