Live Marathipepar [ State Employee Mahagai Bhatta Vadh ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी भ्रमनिराशा होण्याची मोठी शक्यता आहे . कारण माहे जुलै महिन्यांपासून केंद्र सरकारने डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली आहे . तर राज्यातील कर्मचाऱ्यांना केवळ 2 टक्यांची वाढ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
राज्यातील कर्मचाऱ्यांची ऐन दिवाळी सणांमध्ये महागाई भत्यांमध्ये 2 टक्यांची वाढ लागु करण्यात येणार असून याबाबत अधिकृत निर्णय येत्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात येणार असल्याची आत्ताची महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा माहे जुलै 2023 पासून 42 टक्के वरुन डी.ए दर हे 44 टक्केपर्यंत पोहोचणार आहे .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली असल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 46 टक्के झाला आहे . परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना 4 टक्के ऐवजी 2 टक्के डी.ए वाढ होत असल्याने ऐन दिवाळी सणांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांची भ्रमनिराशा होईल .
राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 44 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार असल्याची अर्थ मंत्रालयाकडून निर्णय देखिल जाहीर करण्यात आला असल्याचे वृत्त मिडिया रिपार्ट नुसार समोर येत आहेत .
सदरची वाढीव डी.ए हा माहे जुलै 2023 पासुनच लागु करण्यात येणार असल्याने , माहे जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोंबर या चार महिन्यातील डी.ए फरकाचा लाभ रोखीने अदा करण्यात येणार आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ अपेक्षित होते , परंतु आत्ताच्या मिळालेल्या रिपोर्टनुसार केवळ 2 टक्केच डी.ए वाढ होत असल्याने , काही अंशी राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांमध्ये नाराजगी दिसून येईल . मंत्रीमंडळ बैठकीनंतरच DA मधील वाढ नेमकी कीती होइल, हे समजेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.