Spread the love

Live Marathipepar .संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या ह्या आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुका पुर्वीच पुर्ण करण्यात येणार आहेत . यांमध्ये जुनी पेन्शन योजना , महागाई भत्ता वाढ , सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ इ.प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यात येणार आहेत .

महागाई भत्ता वाढ : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे , तर राज्यातील उर्वरित इतर सर्व शासकयी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डी.ए वाढ करणेबाबत अधिकृत GR याच महिन्यात निर्गमित करण्यात येणार आहे .ज्यामुळे  राज्यातील कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात येईल . तर माहे जानेवारी 2024 पासून डी.ए मध्ये आणखीण 4 ते 5 टक्के वाढ करण्यात येईल , ज्यामुळे एकुण महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल .

जुनी पेन्शन योजना : सध्या राज्य शासनांकडून जुनी पेन्शन योजना ऐवजी गॅरंटेड पेन्शन प्रणाली लागु करण्याची तयारी दर्शविली आहे  , ज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार पेन्शन लागु करण्यात येईल . सेवानिवृत्तीच्या कालावधीनुसार शेवटच्या मुळ वेतनाच्या 35 टक्के , 40 टक्के आणि 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून लागु करण्यात येईल . परंतु या पेन्शन योजनेस देखिल राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध असल्याचे दिसून येत असल्याने , जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी लवकरच पुर्ण होणार आहे .

सेवानिवृत्तीचे वय : केंद्र सरकार तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये दोन वर्षांची वाढ केल्याने , सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे झाले आहेत .याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे . यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उचित निर्णय घेतला जाणार आहे , ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 02 वर्षांचा लाभ मिळणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *