Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Payment Vadh State Govt. Nirnay ] : राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणे मध्ये कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका तसेच गट प्रवर्तकांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे , या बाबत राज्य शासनांकडून अधिकृत्त निर्णय देखिल घेण्यात आलेला आहे .त्याचबरोबर दिवाळी सणानिमित्त सदर कर्मचाऱ्यांना 2 हजार इतकी रक्कम बोनस म्हणून देखिल जाहीर करण्यात आलेली आहे .
राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली वार बुधवार रोजी आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली , यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर तसेच आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार सहसंचालक सुभाष बोरकर यांच्या आरोग्य यंत्रणेमधील प्रमुख अधिकारी उपस्थित होते .
सदर बैठकीमध्ये राज्यातील आशा स्वयंसेविकांच्या मानधनात तब्बल 7,000/- रुपयेत तर गट प्रवर्तकांच्या मानधनात 6,200/- इतकी रक्कम वाढविण्यात आली आहे . सध्याच्या घडीला आशा स्वयंसेविकांना दरमहा राज्य सरकारकडून 5,000/- तर केंद्र सरकार कडून 3,000/- रुपये असे 8,000/- रुपये मानधन देण्यात येते आता यांमध्ये आणखीण 7,000/- रुपयांची वाढ झाल्याने आता एकुण 15,000/-रुपये दरमहा मानधन देण्यात येईल .
तर गट प्रवर्तकांना सध्याच्या घडीला 6,200/- रुपये इतके मानधन देण्यात येत होते , तर केंद्र शासन स्तरावरुन 8,775 इतके मानधन देण्यात येत होते आता पुन्हा एकदा 6,200/- रुपये मानधनात वाढ केल्याने , आता आशा गट प्रवर्तकांना एकुण मानधन 20,875 इतके मिळणार आहेत .
तसेच राज्य शासनांकडून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दिवाळी सणानिमित्त भाऊबिज भेट म्हणून 2,000/- रुपयांची दिवाळी बोनस देण्यात आली आहे . यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दिवाळी सणानिमित्त मोठा आर्थिक लाभ प्राप्त झाला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.