Spread the love

Live marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ state employee MAHAGAI BHATTA 46% GR ] : आज दि.01 नोव्हेंबर 2023 रोजी मोठा महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे , सदर शासन निर्णयानुसार महागाई भत्ता मध्ये केन्द्र सरकार प्रमाणे 4% वाढ लागू करण्यात आलेली आहे .

केंद्रीय वित्त विभाग, (कें द्र सरकार), यांच्या क्र.1/4/2023-E-II(B), दि.20.10.2023 रोजी केंद्रिय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबतचा कार्यालयीन ज्ञापनची प्रत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागास प्राप्त झालेली आहे . यानुसार सदर विभागांकडून राज्यातील दुय्यम न्यायिक अधिकारी तसेच पेन्शनधारकांना DA वाढ लागू करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत की , दि.01 जुलै 2023 पासुन राज्यांतील दुय्यम न्यायिक अधिकारी तसेच पेन्शनधारकांना केन्द्र सरकार प्रमाणे वाढीव 4% टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे , यामुळे सदर अधिकारी/ पेन्शन धारक यांचा एकूण DA हा 46% झाला आहे .

सदर निर्णयानुसार वाढीव 4% महागाई भत्ता हा रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामुळे राज्यातील दुय्यम न्यायिक अधिकारी तसेच पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे . तर उर्वरित राज्यांतील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव DA चा लाभ लागू करणेबाबत, लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल .

दि.01.11.2023 रोजी महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात सविस्तर शासन निर्णय पुढीप्रमाणे पाहू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *