Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : राज्य शासनांने राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तसेच कर्मचारी वर्ग यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरठादार संस्थेचे / एजन्सीचे पॅनल नियुक्तीचा दिनांक 06.09.2023 रोजीचा शासन निर्णय रद्द करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार , विविध शासकीय विभागांना / कार्यालयांना या विभागाच्या 2021 मध्ये निविदा प्रक्रिया राबविलेल्या व दिनांक 06.09.2023 रोजीच्या शसन निर्णयानुसार नियुक्त करण्यात आलेल्या पॅनलवरील एजन्सीकडून दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 पासून मनुष्यबळाची सेवा घेता येणार नाहीत असे स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच संबंधित शासकीय विभागांनी तसेच कार्यालयांनी त्यांच्या स्तरावरी आवश्यकता नुसार नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच ज्या शासकीय विभागांनी तसेच कार्यालयांनी सदर उर्जा व कामगार विभागाने दिनांक 06 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे मनुष्यबळाच्या सेवा असतील , त्या विभागांनी / कार्यालयांनी दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 पासून 09 महिन्यांच्या आत मनुष्यबळाच्या सेवा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने संपुष्टात आणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर बाह्यस्त्रोताद्वारे 09 कंपनींना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली होती . सदत कंपन्यांची मुदतवाढ ही दिनांक 18 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , संपष्टात आणण्यात आलेल्या आहेत . आता सदर शासन निर्णयानुसार , सदर कंपन्यांच्या मुदतवाढ पुर्णत : रद्द करण्यात आलेली आहे .
या संदर्भात उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..