परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणे , संदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 25 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक १ नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर अकृषी विद्यापीठे व संलग्नित मान्यताप्राप्त अशासकीय, तंत्रशिक्षण संचालनालय ,कला संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या अशासकीय , अनुदानित संस्था ,शासकीय अनुदानित अभिमत विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालय, तंत्रशास्त्र अभियांत्रिकी ,औषधनिर्माण शास्त्र ,वास्तुशास्त्र महाविद्यालय/ तंत्रनिकेने , यामधील शासकीय अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान मंजूर करण्यात येत आहे .
रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन त्याचबरोबर सेवानिवृत्त उपदान सदर शासन शासन निर्णय नुसार मंजूर करण्यात येत आहेत .त्याचबरोबर सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास रुग्णता निवृत्तीवेतन महाराष्ट्र नागरी सेवा( निवृत्ती वेतन नियम) 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन , रुग्णता निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे .
तसेच महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान या शासन निर्णय नुसार मंजुरी देण्यात येत आहे .यामध्ये जे कर्मचारी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील , त्यांना नमुना 01 प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य असणार आहे .
हे पण वाचा : जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीमध्ये किती आहे अधिकार , जाणून घ्या उच्च न्यायालयाचा निकाल !
यासंदर्भातील कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन योजना लागू करणे संदर्भातील उच्च व तंत्र शिक्षण विभाग कडून निर्गमित करण्यात आलेला GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !
आपण जर शासकीय ,निमशासकीय, शिक्षक -शिक्षकेतर , पेन्शनधारक कर्मचारी असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !