Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या वेतन निधी संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शिक्षण उपसंचालक शिक्षण संचलनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर केलेला रुपये 36,68,000/- रुपये रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव पावसाळी अधिवेशानात मंजुर करण्यात आलेला आहे . सदर मंजुर तरतुद वित्त विभागाने वितरणासाठी उपलब्ध दिल्याने निधी वितरण करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

यानुसार आता राज्य शासनांने सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये वाशिम , जालना , बुलढाणा व यवतमाळ या जिल्ह्यांतील सैनिकी शाळांतील अतिरिक्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 20 टक्के प्रमाणे वेतन अदा करण्यासाठी मागणी क्रमांक ई-2 2202 सर्वसाधारण शिक्षण , 02- माध्यमिक शिक्षक , 110 अशासकयी माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक , 00 09 सैनिक शाळांना सहाय्यक अनुदान ..

तसेच 36- सहाय्यक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्षांतर्गत पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजुर करण्यात आलेली रक्कम रुपये 36,68,000/- रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 794 / व्यय दिनांक 06.10.2023 नुसार प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात राजय शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202310301703109821 ) पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *