Live marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ New Pension Scheme ] : राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणी लक्षात घेता , सरकारकडून आता जुनी पेन्शन योजना ऐवजी नविन गॅरंटेड पेन्शन प्रणाली अस्थित्वात आणणार आहे , यांमध्ये मुळ वेतनाच्या 35% , 40% , 50% रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येणार आहे .
जुनी पेन्शन योजनांमध्ये , कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी असणाऱ्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येते .तर सदर नविन गॅरंटेड पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार 35% , 40% , 50% हमी पेन्शन योजना देण्यात येईल . यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 20 वर्षे होईल त्यांना शेवटच्या मुळ वेतनाच्या 35 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल . तर ज्यांची सेवा ही 20 वर्षे ते 30 वर्षांपर्यंत झाली आहे अशांना शेवटच्या मुळ वेतनाच्या 40 टक्के रक्कम पेन्शन म्हणून बहाल करण्यात येईल .
तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 30 वर्षांच्या पुढे होईल अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येईल . परंतु या पेन्शन प्रणालीमध्ये भविष्यात नविन वेतन आयोग लागु झाल्यानंतर देखिल वाढ करण्यात येणार नाहीत . तसेच ही पेन्शन फिक्स स्वरुपात देण्यात येईल , तर यांमध्ये महागाई भत्याचा समावेश असणार नाही .
त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना नुसार कर्मचाऱ्यांचे वय हे 80 वर्षांपेक्षा अधिक झाल्यास , पेन्शन मध्ये 10 टक्के वाढ करण्यात येते , तर सदर गारंटीड पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही . तसेच यांमध्ये कर्मचाऱ्यांना 10 टक्के रक्कमेचे योगदान पुर्वीप्रमाणे द्यावे लागेल .
सदर गॅरंटेड पेन्शन योजना केंद्र सरकारकडून गठीत पेन्शन अभ्यास समितीकडून समोर येत आहेत . ही पेन्शन योजना सरकार लागु करण्यातच्या तयारीत आहे , परंतु यांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे कोणतेही लाभ मिळत नसल्याने , यावर कर्मचाऱ्यांचा कायम विरोध असेल हे निश्चित आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.