Spread the love

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Public Leave New Time Table & Employee Payment New Update ] : शालेय शिक्षण विभागांकडून शाळांना यंदाच्या दिवाळी सुट्याच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुट्यांची सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत . तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .

शाळांना दिवाळी सुट्टी यादी जाहीर : राज्यातील शाळांना दिवाळी सुट्टी ही यापुर्वी 6 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होत्या परंतु आता या सुट्टीच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात आलेली असून , शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या शाळांना दिनांक 09 नोव्हेंबर 2023 पासुन ते दिनांक 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .

तर राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा / निवासी शाळांना दिवाळी सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला नसुन दिनांक 06 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी कायम ठेवण्यात आलेली आहे .तर सुट्टी संपल्यानंतर पुढील दिवसांपासून नियमित शाळा सुरु होईल .

कर्मचाऱ्यांचा पगार हा दिवाळी सणापुर्वीच : राज्यातील शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक – कर्मचाऱ्यांचा पगार हा नियमित करण्यासाठी राज्य शासनांकडून नियमित दरमहा वेतनाचा निधी अदा करण्यात येत आहेत . तर माहे ऑक्टोंबर महिन्याच्या वेतन तसेच दिवाळी सण अग्रिम देयक दिवाळी सणापुर्वीच दिनांक 05 नोव्हेंबर पुर्वीच अदा करण्यात येणार आहेत .

याकरीता कार्यालय प्रमुखांनी आपले वेतन बिल हे ट्रेझरीमध्ये विहीत कालावधीमध्ये तपासुन सादर करण्याचे निर्देश प्रशासनांकडून देण्यात आलेले आहेत .म्हणजेच कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वीच वेतन / दिवाळी सण अग्रिमाची रक्कम अदा होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *