Live Marathipepar , प्रणिता पवार [ House Rent Allowance New Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये 01 जुलै 2023 पासून 4 टक्यांची वाढ करण्यात आलेली आहे , आता डी.ए वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता ( HRA ) मध्ये देखिल वाढ होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहेत , नविन आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 25 टक्के पेक्षा अधिक झाल्यानंतर घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात आली . आता सध्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार 27 टक्के , 18 टक्के व 9 टक्के या प्रमाणात घरभाडे अदा करण्यात येत आहे .
महागाई भत्ता 50 टक्के पार केल्यास HRA मध्ये होणार वाढ : सरकारने दि.01 जुलै 2023 पासून डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु केल्याने , एकुण महागाई भत्ता हा 46 टक्के पर्यंत पोहोचला आहे . सदरचा महागाई भत्ता हा 50 टक्के पार केल्यास घरभाडे भत्ता मध्ये वाढ करणे नियोजित आहे . जानेवारी 2024 मध्ये डी.ए मध्ये पुन्हा एकदा 4 टक्के वाढ लागु केल्यास , एकुण महागाई भत्ता हा 50 टक्के होईल . त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तामध्ये सुधारणा करण्यात येईल .
असे असतील सुधारित घरभाडे दर : महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , “ Z “ श्रेणीत कार्यरत कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता हा 9 टक्यांवरुन 10 टक्के होईल . तर “ Y” श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता हा 18 टक्यांवरुन 20 टक्के होईल तर “ X “ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता हा 27 टक्यांवरुन 30 टक्के होईल .
सुधारित घरभाडे भत्ता कधी लागु होणार : माहे जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्यात 4 टक्यांची वाढ केल्यास , एकुण डी.ए हा 50 टक्के होईल तर पुन्हा जुलै 2024 मध्ये आणखीण 4 टक्यांची वाढ केल्यास एकुण महागाई भत्ता हा 54 टक्के होईल . म्हणजेच डी.ए हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल . यामुळे सुधारित घरभाडे भत्ता हा जुलै 2024 नंतर लागु करण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.