Spread the love

live marathipepar , संगिता पवार [ 7th Pay Commission DA ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता दि.01 जुलै 2023 पासून 46 टक्के झालेला आहे .

दिनांक 1 जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर केलेला 4% टक्के वाढीव महागाई भत्ता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करणे संदर्भात कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. विश्वास काटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना पत्र सादर केले आहे , या संदर्भातील सविस्तर पत्र पुढील प्रमाणे पाहूयात ..

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिनांक 01 जुलै 2023 पासून सध्या अनुज्ञेय असलेल्या 42 टक्के महागाई भत्यमध्ये आणखीन चार टक्क्यांची वाढ केली आहे . सदर वाढीव महागाई भत्याची कार्यालयीन ज्ञापनाची प्रत माहिती करिता सदर पत्रासोबत जोडून पाठवण्यात आलेली आहे .

तसेच बाजारात सतत वाढत असलेल्या महागाईचा मुकाबला करण्यासाठी महागाई भत्त्याच्या रूपात भरपाई देणे संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेली बांधिलकी मान्य केली आहे . त्यानुसार वाढीव महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा दिला जातो .

राज्यात दिवाळी सणाचे औचित्य साधून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना दिनांक 01 जुलै 2023 पासून चा चार टक्के व महागाई भत्ता रोखीने तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी विनंती सदर पत्रान्वये करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर पत्र खालील प्रमाणे पाहू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *