Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 46 टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .

महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ : केंद्र सरकारने नवरात्री सणा निमित्त केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्तांमध्ये 4 टक्के वाढ लागु केली आहे , सदरची डी.ए वाढ ही माहे जुलै 2023 पासून डी.ए फरकांसह लागु करण्यात आली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे .

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार डी.ए लाभ : केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केलेली कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही राज्य शासनांच्या वित्त विभागास प्राप्त झालेली आहे . यामुळे आता लवकरच राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .त्यानंतर राज्यातील इतर सर्व सरकारी – निमसरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ माहे जुलै 2023 पासून डी.ए फरकासह मिळणार आहे .

अधिकृत शासन निर्णय दिवाळीपुर्वीच : राज्य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय दिवाळी सणापुर्वी म्हणजेच या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यातच निर्गमित होण्याची मोठी शक्यता आहे . ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 46 टक्के दराने डी.ए लाभ लागु होईल .

वित्त विभागांकडून प्रस्ताव : केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केलेली कार्यालयीन ज्ञापनाची प्रत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडे प्राप्त झाल्याने , वित्त विभागांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करणेबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *