Spread the love

Live Marathipepar संगिता पवार [ State Employee Stike ] : राज्यातील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) कर्मचाारी तसेच इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन व इतर मागणींसाठी पुन्हा एकदा बेमुद संपावर जाणार आहेत , यासाठी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे , या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त व संपाची तारीख पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्यातील तब्बल 18 लाख राज्य कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मार्च महिन्यांत बेमुदत संपावर गेले होते , यावेळी राज्य शासनांने सकारात्मक आश्वासन देवून कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेण्यात आलेला नाही . यामुळे राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय कर्मचारी संघटनांची बैठक काल दिनांक 21.10.2023 रोजी आयोजित करण्यात आलेली होती . या बैठकीमध्ये जुनी पेन्शन सह इतर 17 मागण्यासांसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली .

आण‍ि बैठकीमध्ये सर्वतोवर चर्चेनंतर जुनी पेन्शन योजनांसह इतर 17 मागण्यांसाठी दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत .राज्य शासनांने आश्वासन देवूनही जुनी पेन्शन योजना लागु न केल्याने , कर्मचाऱ्यांचा सरकारवरील रोष अधिकच वाढला आहे . यामुळे संपाची तिव्रता यावेळी अधिक असणार आहे .

राज्य सरकारने मार्च महिन्यांत जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत गठीत अभ्यास समितीने अद्याप पर्यंत आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला नाही . यावेळी राज्य शासनांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी आश्वासन देवून पुढील 03 महिन्यांत जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते .

आज आश्वासनाला 08 महिने पुर्ण होत आहेत , तरी देखिल पेन्शन योजना लागु करणेबाबत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला नाही .यामुळे आता राज्यातील सर्व कर्मचारी संघटना एकत्र येवून , जुनी पेन्शन साठी दिनांक 18 नोव्हेंबर या दिवशी राज्यांमध्ये एकदिवसीय संप आयोजित करण्यात आलेले आहेत . या दिवशी राज्यातील सर्व कार्यालये बंद असणार आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *