7 व्या वेतन आयोगांमध्ये तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लाभ अनुज्ञेय करणेबाबत , वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय !

Spread the love

Live marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [ आश्वासित प्रगती योजना सुधारित शासन निर्णय ]  : सातव्या वेतन आयोगांमध्ये वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनांचे तीन लाभ लागु करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील ज्या शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना यापुर्वीच्या योजनानुसार पदोन्नतीच्या साखळीमधील पदावर दिनांक 01 जानेवारी 2016 पुर्वीच पहिला लाभ मंजुर करण्यात आलेला असल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 12+08 अशी 20 वर्षांची सेवा ही दिनांक 01 जानेवारी 2016 पुर्वी पुर्ण हेात असल्यास सदर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनाचा दुसरा लाभ दिनांक 01 जानेवारी 2016 पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरणार आहेत .

यांमध्ये एखादा कर्मचारी हा दिनांक 01 जुलै 1994 रोजी लिपिक टंकलेखक या पदांवर मुळ नियुक्ती झाला असेल यांमध्ये सदर कर्मचाऱ्यांस 5200-20200 ग्रेड पे 1900 या वेतन श्रेणींमध्ये नियुक्ती असेल अशा कर्मचाऱ्यांस शासन सेवेत 12 वर्षे दिनांक 01 जुलै 2006 रोजी पुर्ण होतील . अशा कर्मचाऱ्यांस दुसरा लाभ दिनांक 01 जुलै 2018 रोजी अनुज्ञेय होईल .

आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ 20 वर्षे ( 12+08 ) वर्षानंतर अनुज्ञेय असला तरी , दिनांक 01 जुलै 2014 पासून दुसरा लाभ हा अनुज्ञेय असणार आहे .तर दिनांक 01 जानेवारी 2016 पासून सदर योजना अंमलात आल्याने सदर लाभ हा दिनांक 01 जानेवारी 2016 पासून अनुज्ञेय होणार आहे व यापुर्वी दिनांक 01 जुलै 2018 रोजी 24 वर्षे लाभ मंजुर केला असल्यास , सदर लाभ हा रद्द करण्यात येणार आहे .म्हणजेच सुधारित दिनांकानुसार लाभ मंजुर करण्यात येणार येते , त्याऐवजी पुढीप्रमाणे सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात सुधारित करण्यात आलेला आश्वासित प्रगती योजना ( आश्वासित प्रगती योजना  7 वा वेतन आयोग ) शासन निर्णया पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सुधारीत आश्वासित प्रगति योजना

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment