अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनापासून 4 टक्के डी.ए वाढ लागु ! मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA Vadh Nirnay ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री सणाचे औचित्य साधून सरकारने कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्तांमध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आलेली आहे .काल पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सदरचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .

केंद्र सरकारची दिनांक 18.10.2023 रोजी मंत्रीमंडळ बैठक आयोजित होती , या बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्यांपासून महागाई भत्तांमध्ये आणखीण चार टक्के वाढ लागु करणेबाबत मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे .सदरचा वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार आहे .

डी.ए थकबाकी : सदरचा वाढीच 4 टक्के महागाई भत्ता हा माहे जुलै 2023 पासूनच लागु करण्यात आला असल्याने , माहे जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर या तिन महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखिल ऑक्टोंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहेत .सदर वाढीव डी.ए चा  लाभ केंद्र सरकारच्या अधिनस्थ 52 लाख कर्मचारी तसेच 60 लाख पेन्शनधारकांना होणार आहे .

माहे जानेवारी महिन्यांपासून 42 टक्के प्रमाणे डी.ए लाभ देण्यात येत होता , आता जुलै महिन्यांपासून आणखीण 4 टक्के वाढ लागु केल्याने , जुलै महिन्यांपासून 46 टक्के दराने डी.ए वाढ लागु झाली आहे .ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारानुसार , जुलै 2023 मध्ये CPI -IW 3.3 ने वाढून निर्देशांक हा 139.9 वर पोहचल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात आली आहे .महागाई भत्तांमध्ये वाढ झाली असल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनांमध्ये देखिल मोठी वाढ झाली आहे .

केंद्र सरकारच्या धर्तीवर मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए लाभ : केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्याने , केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2023 पासून 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून दिवाळीपुर्वीच मोठा निर्णय घेतील .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment