Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Divali Bhet , Shasan Nirnay ] : दिवाळी सणापुर्वीच राज्यातील खाली नमुद कर्मचाऱ्यांना आर्थिक भेट अदा करणे संदर्भात दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र शासनांच्या योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका , मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2,000/- रुपये प्रमाणे दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट रक्कम देण्यास राज्य शासनांने मंजुरी देण्यात आलेली आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका , मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरीता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना , नवि मंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणुन घोषित करण्यात येत आहेत . सदर भेट रक्कम अदा करण्याकरीता एकुण 37,3302 /- कोटी रुपये ( अक्षरी – सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .
तसेच सदर शासन निर्णयानुसार , आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना , महाराष्ट्र राज्य नवि मुंबई यांनी कार्यरत अंगणवाडी सेविका , मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांना दिवाळीपुर्वी भाऊबीज भेट रक्कम अदा करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.