Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment / Allowance , Pension Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन 2023-24 या वर्षांची यादी सुधारित करण्यात आलेली आहे .या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेवून आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमानुकुल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पुर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून अभिप्राय घेण्यात आले . सहकार , वस्त्रोद्योग व पणन विभागाने मागील पाच वर्षातील लेखापरीक्षण अहवाल अ वर्ग असणाऱ्या खालील नमुद केलेले 14 जिल्हा मध्यवर्ती बँकांची शिफारस केली आहे .

यांमध्ये 1. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 3. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 4. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 5. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  6. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 7. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 8. सांगली  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 

9.कोल्हापूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 10. लातुर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 11. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 12. भंडारा  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 13. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 14. गडचिरोली  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सन 2023-24 या वर्षाकरीता शासकीय बँकींग व्यवहार करण्यास तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मान्यता प्रदान करण्यात येत आहे .

तसेच सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 01 महिन्याच्या आत सदर यादींमधील नमुद बँकांनी वेतन व निवृत्तीवेतन प्रदानाकरीता शासनांसोबत आवश्यक करार करणे आवश्यक असणार आहेत . या संदर्भात वित्त विभागांकडून दि.17.10.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *