Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Namo 11 Kalami Karyakram ] : देशाचे विद्यमान पंतप्रधान यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात नमेा 11 कलमी कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देण्यात आली आहे . सदर कार्यक्रम अंतर्गत राज्यातील मंत्रीमंडळाची छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये विविध कार्यक्रम / उपक्रम याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा घेण्यात आला . नमो 11 कलमी कार्यक्रम अंतर्गत पुढील कार्यक्रम / उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे .
यांमध्ये नमो महिला सशक्तीकरण अभियानातुन तब्बल 2 कोटी महिलांचा बचत गटांमध्ये समावेश करण्यात येणार आहे , ज्यातुन महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहेत . ज्यांमध्ये उद्योग / गृहउद्योग कामांसाठी जागा उपलब्ध करुन देणे व्यवसायासाठी कमी व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध करुन देणे हे उद्देश समोर ठेवण्यात आलेले आहेत .
नमो कल्याण अभियानातुन तब्बल 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे . तसेच या कार्यक्रम अंतर्गत तब्ल 7300 शेततळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे, याकरीता मागणीनुसार निधीचे वितरण करण्यात येणार आहे .
राज्यात 73 आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार आहेत ज्यांमध्ये शौचालयांची बांधी , रस्त्यांचे जाळे , महिला सक्ष्ज्ञमीकरण , पक्की घरे , गावातच रोजगाराची उपलबधता , सौर उर्जेचा वार इ.बाबीतुन आत्मनिर्भर करण्यात येणार आहेत .तसेच नमो गरीब व मागास वर्गीय सन्मान अभियानातुन विकास कामे जसे वीज पुरवठा , रस्ते , समाजमंदिरांची उभारणी इत्यादी विकास कामे करण्यात येणार आहेत .
तसेच प्रत्येक जिल्हांमध्ये 73 नव्याने ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे ज्यांमध्ये संपुर्ण सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . तसेच राज्यातील 73 आदिवासी शाळा ह्या स्मार्ट होणार आहेत . तसेच दिव्यांगांसाठी 73 पुनर्वसन केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे .तसेच 73 गावांमध्ये मुलांसाठी क्रिडा मैदाने तसेच 73 शहर सौंदर्यीकरणाचा शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे .तसेच 73 मंदिरांच्या विकासासाठी तांत्रिक मान्यतेची कार्यवाही करण्यात येणार आहे .
स्त्रोत : राज्य शासनांचे अधिकृत प्रसिद्धी संकेतस्थळ https://mahasamvad.in/