Spread the love

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Transfer Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक मा.उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांच्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे .

मा.उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर रिट याचिकेतील याचिकाकर्ते हे वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षक आहेत , शासन पत्र दिनांक 23.08.2023 मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे याचिकाकत्यांना सन 2023 मधील आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत नव्याने अर्ज भरण्याची संधी देण्याची व दिनांक 23.05.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार , आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया राबविण्याची याचिकाकर्त्यांची विनंती आहे .

तसेच ज्या शिक्षकांचे सन 2022 मध्ये आवेदन सादर केल्यानंतर सध्य स्थितीमध्ये संवर्ग मध्ये बदल झालेला आहे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना नविन संवर्गातून आवेदन सादर करण्याची संधी देणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे .सदर प्रक्रिरणी रिट याचिकेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे नमुद वस्तुस्थिती मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याकरीता शासकीय अभियोक्ता यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , शिक्षक भरतीकरीता रिक्त पदांची संख्या ही सुनिश्चित करणे बाबत त्याचबरोबर रिक्त पदांवर नियुक्ती देत असताना काही सुधारित अटी लागू करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 21.06.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये ग्रामविकास विभाग मार्फत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन 2022 मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे .

तसेच सन 2022 मधील आंतरजिल्हा बदलीकरीता विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही , अशा शिक्षकांचे विनंती आवेदन प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्या प्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच शालेय शिक्षण विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार सन 2022 मधील आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेसाठी आवेदन केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशाच शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज विचारात घेवून बदलीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर बदली प्रक्रिया ही सन 2022 साठीची बदलीप्रक्रिया सुरु झाल्यानंतर सन 2023 मध्ये बदलीसाठी विनंती केलेल्या बदलीपात्र शिक्षकांचा बदलीप्रक्रियेमध्ये विचार करण्यात येईल .

या संदर्भात ग्रामविकास विभागांकडून दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *