Spread the love

Live Marathipepar संगिता पवार [ municipal Corporation Diwali Festival Advance ] : दिवाळी सणांची सुरुवात पुढील महिन्यांच्या 4 तारखेपासून सुरुवात होत असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना सणांसाठी आर्थिक मदत म्हणून सण अग्रिम / सानुग्रह अनुदान देण्यात येते .कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार  17,000/- रुपये व 8,500/- रुपये पालिका प्रशासनांकडून सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलेले आहेत .

नाशिक पालिका प्रशासनांमधील कायम अधिकारी , कर्मचारी , प्राथमिक शिक्षक , मानधनावरील अधिकारी / कर्मचारी , मदतनिस , अंशकालीन शिक्षक , शिक्षण विभागातील कर्मचारी , एनयूएलएम कर्मचारी , क्षयरोग नियंत्रण सोसायटीतीमधील कार्यरत कर्मचारी , अंगणवाडी मुख्यसेविका , मानद वैद्यकीय अधिकारी , रोजंदारी मानधनावरील कर्मचारी यांना 17,000/- दिवाळी सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आलेला आहे .

जे कि कायम कर्मचाऱ्यांनी दिवाळी सणानिमित्त नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने 25,000/- रुपये सानुग्रह अनुदाची मागणी करण्यात आलेली होती , परंतु नाशिक पालिका प्रशासनांचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी 17,000/- रुपये अनुदान देण्यात मंजुरी दिली .याचा लाभ पालिका प्रशासनांमधील तब्बल 5,800/-अधिकारी / कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे .

त्याचबरोबर शासन अनुदानांमधून वेतन / मानधन घेणाऱ्या 685 कर्मचाऱ्यांना 8,500/- रुपये इतका दिवाळी सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आलेला आहे .सदर दिवाळी सानूग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत प्राप्त होणार आहे अथवा पुरवणी देयक मंजुर करण्यात येणार आहे .

दिवाळी सानुग्रह अनुदाकरीता पालिका प्रशासनांच्या अंदाजपत्रकांमध्ये रुपये 12 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली होती , परंतु पालिका प्रशासनांच्या ठरावानंतर आता कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाकरीता 10 कोटी रुपयेच खर्च येणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *