Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme Committee ] : महाराष्ट्र राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत माहिती मिळावी याकरीता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेला होता . या ऑनलाईन अर्जावर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 12.10.2023 रोजी सदर आवेदनांस उत्तर देण्याकरीता आवेदन कर्त्यास माहिती सादर करणेबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .

श्री.योगेश पखाले अमरावती यांने एन पी एस योजना व जुनी पेन्शन योजना याबाबत राज्य सरकारतर्फे नियुक्त समिती बाबत माहिती मिळावी याकरीता दिनांक 07.10.2023 रोजी माहितीच्या अधिकार कायद्यानुसार ऑनलाईन आवेदन सादर केला होता .या आवेदनांमध्ये योगेश पखाले यांनी प्रमुख दोन प्रश्नांचे उत्तर उपस्थित केले होते .

प्रश्न क्र.01 : यांमध्ये दिनांक 01.10.2023 पर्यंत झालेल्या सभांचे इतिवृत्तांत देण्यात यावेत अशा प्रश्नांस राज्य शासनांकडून नमुद करण्यात आले आहेत कि , या संदर्भात राज्य शासनांकडून कोणताही अभिलेख या कार्यासनाकडे ( वित्त विभाग ) उपलब्ध नाही .

प्रश्न क्र.02 : समितीने सरकारकडे आपल्या विभागाकडे अहवाल / शिफारसी सादर केला असल्यास प्रत देण्यात यावी , असे नमुद केल्यानंतर राज्य शसनांकडून उत्तर देण्यात आलेले आहे‍ कि , समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याने माहिती उपलब्ध करुन देणे शक्य नाही . अशी माहिती माहितीच्या अधिकार अंतर्गत देण्यात आलेली आहे .

या संदर्भात वित्त विभागांकडून श्री.योगेश पखाले यांना देण्यात माहितीचा अधिकार अंतर्गत देण्यात आलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *