Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , अखेर राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
जिल्हा परिषदेमध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी भरती प्रक्रिया सुरु झालेल्या तथापि नियुक्ती आदेश दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर दिलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन / डी.एन ई 136 संघटनेचे दिनांक 25.05.2023 रोजीचे निवेदन तसेच रिट याचिका क्र.1893 / 2020 व रिट याचिका क्र.3046 / 2023 वरील मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजीचे निवेदन नुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर संदर्भ लक्षात घेवून , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे संदर्भाधिन क्र.01 येथिल निवेदन सोबत व मा.उच्च न्यायालयाचे संदर्भाधिन क्र.02 येथील आदेश जोडून नमुद करण्यात आले आहेत कि , प्रस्तुत निवेदनान्वये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी भरती प्रक्रिया सुरु झालेल्या तथापि नियुक्ती आदेश दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर दिलेलया ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत विनंती करण्याात आलेली होती .
त्याचबरोबर उच्च न्यायायलयाच्या रिट याचिकांमध्ये दिलेल्या निर्णयानुसार , सहा आठवड्यात शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश दिले असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये वरील अर्हता मध्ये बसणाऱ्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे निर्देश राज्याचे कक्ष अधिकारी यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेला आहे .
या संदर्भातील राज्य शासनांच्या ग्रामविकास विभाग , बांधकाम भवन मार्फत निर्गमित करण्यात आलेला दिनांक 29.08.2023 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.