MTV marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee shasan Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील नागरिक हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये येत असतात बऱ्यांच वेळा त्यांना काम असणारे संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव तसेच पदना माहित होत नाहीत , याकरीता त्यांना ओळख पटणे आवश्यक बाब असल्याने , कार्यालयाच्या दर्शनी भागावर कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची नावे लावणे आवश्यक आहे , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 07 मे 2023 रोजी परिपत्रक देखिल निर्गमित करण्यात आलेले हेाते .
तरी देखिल बऱ्याच शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र दर्शविले जात नसल्याने , सदर शासन परिपत्रकान्वये राज्यातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयांमध्ये असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागांमध्ये ( सहज दिसेल असा भाग ) लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत .या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर शासन परिपत्रक हे राज्य शासनांच्या दिनांक 07 मे 2014 रोजीच्या परिपत्रकातील सुचनांचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे , या संदर्भात प्रशासन प्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रशासकीय विभागांना पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक खालील प्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.