लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : आपल्या भारत देशामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांचा मार्केट वाढत आहे ,आपण बघितलं असेल की मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक कार ,इलेक्ट्रॉनिक स्कूटर आणि इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा इ.वाहन हे इलेक्ट्रॉनिक निघालेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की सोलर चार्जिंग सह एक स्वस्त ev कार भारतामध्ये लॉन्च होणार आहे.
ऑटो एक्स्पो 2023 EVA इव्हेंटमध्ये नुकतेच भारतातील पहिली ev इलेक्ट्रिक कार म्हणून EVA प्रदर्शित करण्यात आलेली आहे. ही कार पूर्णपणे सोलर चार्जिंग कार नसून ह्या कारला पण इलेक्ट्रिक चार्जर द्वारे चार्जिंग करून चार्ज करू शकतो. आणि लाईट नसल्यावर सौर ऊर्जेद्वारे देखील या कार ला पण चार्जिंग करू शकतो.
या कारची ड्रायव्हिंग रेंज 200 ते 250 किलोमीटर असणार आहे आणि याच्यामध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी बघायला भेटणार आहे जसे की अँड्रॉइड ऑटो , एप्पल कार प्ले. आणि या कारमध्ये सहा वेगवेगळे कलर आपल्याला बघायला भेटणार आहे आपण आपल्या पसंतीनुसार वेगवेगळ्या रंगामध्ये खरेदी करु शकतो.DC फास्ट चार्जिंग द्वारे आपण या कार ला केवळ 45 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्जिंग करू शकतो.
कधि लाँच होणार : ही कार भारतामध्ये 2024 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे EVA कार चे CEO म्हणाले की, ही कार 2024 च्या जून जुलै पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही या कार ला 2024 मध्ये जून जुलै दरम्यान बुकिंग करू शकता.
कार ची किंमत : भारतामध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होण्याची शक्यता EVA कार CEO यांनी दर्शवली आहे . या कारची किंमत 5 ते 6 लाख रुपये असणार आहे. भारतामध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ईव्ही टाटा टियागो आहे ज्याची सुरुवाती किंमत 8.50 लाख रुपये आहे आणि ही कार टाटा टियागो पेक्षा स्वस्त आहे.