Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर तात्काळ पेन्शनचा लाभ मिळावा तसेच पेन्शन लागु होण्यासाठी येणारे त्रुटी , आवश्यक कागतपत्रे इत्यादी बाबी सदर पेन्शन मार्गदर्शिका मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदर पेन्शन मार्गदर्शिका ही राज्य शासनांच्या कार्यालय महालेखापाल ( ले व ह ) महाराष्ट्र नागपुर विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या साईसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

निवृत्तीवेतनाचे प्रकार  – I) नियत वयमान निवृत्तीवेतन (नियम 63, म.ना.से. (निवृत्ती वेतन) नियम 1982) शासकीय कर्मचाऱ्याला, जे वय पूर्ण झाल्यावर शासकीय नियमानुसार निवृत्त होण्याचा हक्क असतो.वा त्याला निवृत्त होणे भाग असते त्या वयानंतर त्याला देण्यात येणारे , निवृत्तीवेतन म्हणजे नियत वयमान निवृत्तीवेतन.नियत वयमान निवृत्तीवेतनाच्या शर्ती पुढीलप्रमाणे आहेत .

i) वर्ग-4 कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त शासकीय कर्मचारी जे वय वर्षे 58 पूर्ण करतील. ii) वर्ग-4 (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी जे वय वर्षे 60 पूर्ण करतील. आवश्यक कागदपत्रे नियत वयमान निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये खालील कागदपत्रे आवश्यक आहेत व ती कागदपत्रे जोडावीत .नमूना 1 सेवाउपदानाचे नामांकन (कुटुंब असल्यास) सेवाउपदानाचे नामांकन सेवेत आल्यावरच आपल्या कार्यालयप्रमुखाला भरून द्यावे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्यात योग्यरित्या बदल करावा. नमूना-2 सेवा उपदानाचे नामांकन (कुटुंब नसल्यास) 

नमूना – 3 कुटुंबाचे विवरण  : सेवेत आल्यावर या नमून्यात आपल्या कुटुंबाचे विवरण द्यावे. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ किंवा घट झाल्यास तसा बदल त्यात करावा. नमूना 5 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने द्यावयाचा तपशील. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने निवृत्त होण्याच्या आठ महिने आधी स्वतः संबंधी तपशील नमूना-5 मध्ये स्वतःच्या स्वाक्षरीनिशी आपल्या कार्यालयप्रमुखाला भरून द्यावा. सेवानिवृत्तीनंतरचा पत्ता, कोषागाराचे नाव, बॅकेचे शाखेसहित नाव इत्यादी आवश्यक तपशील अचूकपणे लिहावा व स्वतःची स्वाक्षरी करावी. 

नमूना – 5 चे सहपत्र अचुकपणे भरावे व आपले जोडीदारासोबत काढलेले छायाचित्र चिकटवावे. नमूना -6 शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेचा संक्षिप्त तपशील. शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेचा संपूर्ण तपशील संक्षिप्तपणे हया नमून्यात कार्यालयप्रमुखाने भरावा. हया नमून्यातील प्रत्येक स्तंभ अचूकपणे भरणे आवश्यक आहे. अर्हताकारी सेवा अनर्हताकारी सेवा लागू असणारा निवृत्तीवेतनाचा प्रकार इत्यादी आवश्यक तपशील भरावा. भूतपूर्व सैनिकांच्या बाबतीत सैनिकी सेवा व त्यामुळे प्राप्त होत असलेले निवृत्तीवेतन इ. सुध्दा भरावे कारण त्याआधारे त्यांचे कुटुंबनिवृत्ती वेतन देय ठरते. कार्यालयप्रमुखाने नमूना 6 चा भाग-3 (निवृत्तिवेतन परिगणना पत्रक) अवश्य भरावा व निवृत्तीवेतन प्रकरणासोबत पाठवावा. 

नमूना -7  : निवृत्तीवेतन प्रकरण पाठवताना महालेखापाल कार्यालयास लिहावयाच्या पत्राचा नमूना , i) हे प्रपत्र म्हणजे कार्यालयप्रमुखाने महालेखापाल कार्यालयास पेंशन प्रकरण पाठवताना लिहावयाच्या पत्राचा नमूना होय. ii) हया प्रपत्राच्या स्तंभ- 2 मध्ये निवृत्त कर्मचाऱ्याकडून काही शासकीय घेणी असल्यास उल्लेख करावा अशी घेणी ज्या मुख्य शीर्षाखाली जमा करावयाची आहे त्याचा ही उल्लेख करावा. जर शासकीय घेणी नसेल तर निरंक लिहावे. iii) स्तंभ- 3 अ व ब पैकी केवळ स्तंभ ‘अ’ भरावा. स्तंभ अ म्हणजे विभागीय चौकशी प्रलंबीत / प्रस्तावित नाही. स्तंभ ब म्हणजे विभागीय चौकशी प्रलंबीत / प्रस्तावित आहे व अस्थायी पेंशन दिलेली आहे. जर चौकशी प्रलंबीत / प्रस्तावित नसेल तर फक्त स्तंभ अ भरावा व स्तंभ ब खोडून टाकावा. जर विभागीय चौकशी प्रलंबित / प्रस्तावित असेल तर पेंशन प्रकरणच पाठवता येत नाही. त्यामुळे पेंशन प्रकरण पाठवताना स्तंभ ‘ब’ भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

iv) नमूना – 7 कार्यालयप्रमुखानेच स्वाक्षरीत करावा अन्य कोणी स्वाक्षरी करू नये. v) जर पेंशन प्रकरण कार्यालयप्रमुखाचे स्वतःचे असेल तर असे प्रकरण उच्च अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने पाठवावे. सेवानिवृत्तीनंतर द्यावयाची कागदपत्रे  ,सेवानिवृत्तीनंतर खालील कागदपत्रे सादर करावी.

  1. अंतीम वेतन प्रमाणपत्र :- हे प्रमाणपत्र प्रत्यक्ष सेवानिवृत्ती झाल्यानंतर सादर करावे. त्यामध्ये वेतनाचा दर, वेतनमान व ज्या तारखेपर्यंत वेतन दिले ती तारीख असावी. 
  2. ii) ना- घटना प्रमाणपत्र :- – महालेखापाल कार्यालयाकडून सेवानिवृत्ती प्रकरण प्रत्यक्ष सेवानिवृत्तीपूर्वीच मंजूर होऊन आले असल्यास ना- घटना प्रमाणपत्र द्यावे लागते. जर सेवानिवृत्तीपूर्वी पेंशन प्रकरण पाठविल्यानंतर व प्रत्यक्ष सेवानिवृत्तीची तारीख हया दरम्यान काही घटना घडली असल्यास व त्याचा परिणाम सेवानिवृत्ती प्रकरणावर होत असल्यास हया प्रमाणपत्राच्या आधारे कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्ती प्रकरण संशोधित करता येते. II) पूर्णसेवा निवृत्तीवेतन 

i) शासकीय कर्मचारी नियत वयमान पूर्ण होण्यापूर्वीच नियम 10 (4) किंवा 65 (i) (b) नूसार पूर्णसेवा निवृत्ती वेतन घेऊ शकतो. तसेच नियम 10 (5) किंवा (i) (a) अनुसार सुध्दा पूर्णसेवा निवृत्तिवेतन घेऊ शकतो. 

ii) नियम 66 नुसार 20 वर्षाची अर्हताकारी सेवा झाल्यानंतर तीन महिन्याचा नोटीस देऊन स्वेच्छानिवृत्ति पत्करू शकतो. 

  1. खालील शर्तीवर जर शासकीय कर्मचारी एखाद्या महामंडळात, स्वायत्त संस्थेत किंवा स्थानिक प्राधिकरणात सामावून घेतल्या गेला असेल तर नियम-67 नुसार पूर्णसेवा निवृत्तिवेतन घेऊ शकतो. 

पेन्शन मार्गदर्शिका

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *