मराठवाड्यातील मराठा समाजातील जनतेने जालना येथे उपोषण चालू केले होते आणि त्यावेळेस काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या मराठा समाजातील उपोषणामुळे आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव यांच्या समितीने महिन्याभरात अहवाल सादर करावा अशा सूचना मंत्र्यांनी दिलेल्या आहेत.
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाला सुविधा देणासाठी नेमण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाची उप समितीची बैठक सह्याद्री अतीती ग्रहावर झाली. त्यावेळेस या सूचना देण्यात आल्या. मंत्रिमंडळ उप समितीच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले ते जाणून घेऊया.
1)मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीप्रमाण देण्यात येणार आहे.
2)त्याबाबतची प्रक्रिया गतिमान करा असे मुख्यमंत्र्यांची निर्देश.
3)अप्पर मुख्य सचिव समिती महिन्याभरात अहवाल देणार.
4)मराठवाड्यातले महसूल आणि शैक्षणिक रेकॉर्ड तपासणार.
5) हैदराबाद येथून निजाम चे जुने रेकॉर्ड तपासणार
6)कुणबी नोंद असलेल्या वंशावळ तपासणार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,” मराठा समाजात काही प्रमाणात पुढारलेला आहे आणि मेजॉरिटी प्रमाण जी आहे आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेला आहे.”