लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करण्यात यावीत याकरीता राज्य कर्मचारी संघटनांकडून यापुर्वी दोनदा पेन्शन यात्रा काढल्या होत्या . अद्याप देखिल जुनी पेन्शनच्या मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने , पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात करण्यात आली आहे . सदर पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याच्या सविस्तर मार्गक्रमण पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जुनी पेन्शन योजनाच्या मागणीसाठी थेट मुंबई ते दिल्ली अशी यात्रा सायकलवर करण्यात येत आहे .या पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची सुरुवात दि.03.09.2023 रोजी शहापूर ( आसनगाव ) येथून झाली .मुंबई ते दिल्ली असा एकुण 2000 किलोमीटरचा रस्ता आहे . ही पेन्शन यात्रा जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागु होणार नाही तोपर्यंत अविरत पणे चालु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
दि.04 सप्टेंबर रोजी ही पेन्शन यात्रा 95 किलोमीटरचा प्रवास करुन नाशिक एनडीएमव्हीपीच्या सेवक पतसंस्था येथे पोहोचली .नाशिकच्या घोटी येथे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव गगे , तसेच इगतपुरी तालुका अध्यक्ष तसेच सरचिटणीस मंदार अहिरे यांनी स्वागत करुन भोजनाची व्यवस्था केली .
तर दिनांक 05 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नेमिनाथ जैन विद्यालय येथे सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी संघर्ष यात्रेचे सत्कार केले . तर सायंकाळी 7 वाजता मालेगाव टेहरे चौफुली येथे आगमन झाले . व पुढे मालेगाव दिशेने मार्गक्रमण करण्यात आले .
अशा पद्धतीने पेन्शन यात्रेच्या तिसऱ्या टप्याची मुंबई ते दिल्ली असा प्रवासाची सुरुवात करण्यात आलेली आहे . जुनी पेन्शन हा मुद्दा कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने , सर्व परीने सदर यात्रेचे स्वागत व सत्कार जागोजागी करण्यात येत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !