लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँगेस अशा तिन पक्षांची सत्ता आहे , तरी देखिल राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ देणेबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने , काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर राज्यांमध्ये लागु केल्याप्रमाणे जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .
सध्या जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रमाणे लाभ लागु करणे बाबत गठीत करण्यात आलेली अभ्यास समितीने अद्याप पर्यंत आपला अहवाल राज्य शासनांस सादर केला नाही . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण होत असताना दिसून येत आहे .
काँग्रेसची सत्ता आल्यास जुनी पेन्शन लागु होणार : काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन झाल्यास महाराष्ट्र राज्यांमध्ये जूनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल , तर आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या जाहीरनाम्यांमध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा अग्रणी ठेवण्यात येईल , असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे .
सध्या काँग्रेस पक्षाची राज्यांमध्ये जनसंवाद यांत्रा सुरु आहे , या यात्रेदरम्यान दिनांक 03 सप्टेंबर 2023 रोजी वर्धा येथे राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , श्री.नाना पटोले यांना निवेदन सादर केले .
तर राज्यातील कर्मचारी देखिल जो जुनी पेन्शन योजना लागु करेल त्याच पक्षाला मतदान करतील अशी मिशन हाती घेतली आहे . देशांमध्ये राजस्थान , हिमाचल प्रदेश , छत्तीसगढ , कर्नाटक या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाने जुनी पेन्शन मुद्यावर निवडणुका जिंकल्या आहेत .यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षाला आगामी काळांमध्ये यश मिळू शकते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !