लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणेबाबत ही योजना राबविण्यास प्रशासकिय मान्यता देण्यात आलेली आहे .
राज्य शासनातील सेवेत असलेल्या सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरीता राज्यातील सर्व कर्मचारीवृंद यांना प्रशिक्षण देण्याबाबत राज्य शासनाने सदंर्भाधीन दि.23.09.2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण जाहीर केले आहेत .
यानुसार सन 2023-24 मध्ये राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे ही योजना राबविण्यासाठी रुपये 499.20 लक्ष रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे .सदरचा खर्च हा प्रशिक्षण , शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ( कृषी ) कार्यक्रम , इतर खर्च खर्च या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर आदेशान्वये राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या योजना करीता वितरीत करण्यात आलेल्या निधी संदर्भात आयुक्त ( कृषी ) यांना नियंत्रण अधिकारी तसेच सहायक संचालक , कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत .
सदर योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचना , मार्गदर्शक तत्वे तसेच शासनाचे प्रचलित नियम व अटी यानुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे याकरीता संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना संचालक ( आत्मा ) यांनी निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर प्रशिक्षण योजना राबविणे बाबत कृषी विभागाकडून दिनांक 01.09.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !