Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पेपर :  महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सन 2023-24 करीता बदली संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे . राज्य शासनाने बदली धोरणांचे मागील तीन शासन निर्णयांमध्ये सुधारणा करुन नविन सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत , सदर शासन निर्णयांमध्ये सुधारित धोरण विचारात घेवूनच बदली करण्यात येणार आहेत .

बदलीसाठी राज्य शासनांकडून तीन विशेष संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहेत , यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांमध्ये आजारग्रस्त कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे . तर विशेष संवर्ग शिक्षक भाग – 2 मध्ये पती-पत्नी एकत्रिकरणासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे . तर सर्वसाधारण संवर्गामध्ये वयांने ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयांमध्ये स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहेत कि , आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे सदर बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे भत्ते तसेच पदग्रहण अवधी कर्मचाऱ्यांस अनुज्ञेय होणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत सुधारित धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्हा परिषद ( Zilha Parishad ) शिक्षकांची त्यांच्या पसंतीनुसार दिलेल्या जिल्ह्यात जरी आंतरजिल्हा बदली झाली तरी , सदर जिल्ह्यातील बदली रद्द करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द करण्यास परवानगी देण्यात येते , या संदर्भात धोरण निश्चित करण्यात आलेले असून सदर शासन निर्णायांमध्ये धोरण नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : लाडाच्या जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीमध्ये किती आहे अधिकार ?

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , आंतरजिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यात रुजु होण्याबाबत , कार्यवाहीसाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात यावा व सदर कालावधीत बदली आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे नमुद आहे .

पहिल्या आंतरजिल्हा बदलीस पाच वर्षांचा कालावधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा आतंरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल , आंतरजिल्हा बदलीसाठी शासन स्तरावर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत , तसेच अन्य मार्गाने दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहेत .

सदर बदली अपडेट संदर्भात ग्रामविकास विभागांकडून बदली सुधारित धोरण निश्चित करणेबाबतचा शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

बदली शासन निर्णय

आपण जर शासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी , पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *