लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : नमस्कार मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झालेली आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळावा अशी मागणी कृषी विभागाकडून होत आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी पेक्षाही खूप कमी पाऊस झालेला आहे .त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके हातातून निघून गेली आहे . राज्यातील काही ठिकाणी नागरिकांचा पिण्याच्या पाण्याची अडचण आहे . त्यामुळे तेथील लोक दुष्काळामध्ये जगत आहे. केंद्र सरकारने कंपनीची बैठक घेऊन पिक विमा बद्दल चर्चा केलेली आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश महसूल मंडळाचे स्वयंचलित हवामान केंद्र आहेत , त्यामुळे तेथे कमी पावसाचे मोजमाप होते. राज्यातील काही भागांमध्ये सध्या पिके वाळून गेलेली आहे . आणि आता राज्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतरही शेतकऱ्यांच्या त्या पिकांमध्ये कोणताही बदल पडणार नाही , त्यामुळे पिक विमा मंजूर होण्याची शक्यता आहे.
राज्यात अकरा जिल्हा मध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे . त्यामुळे तेथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके हातातून निघून गेलेली आहे. विदर्भ आणि मराठवाडा यासह पश्चिम महाराष्ट्र , पुणे, सातारा ,कोल्हापूर या जिल्ह्यामध्येही 21 दिवसापेक्षाही जास्त पावसाचा खंड पडलेला आहे , येथील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा मिळण्याची शक्यता आहे.