Spread the love

सुधारित बदली धोरण : सन 2023-24 करीता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.23 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर सुधारित धोरणांनुसार सन 2023-24 मधील राज्य कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होणार आहेत .

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम 1967 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजु होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही  संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाारी हे सक्षम प्राधिकारी असणार आहेत . सदर सुधारित बदली GR मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , आंतरजिल्हा बदली हा एक बदली करण्यासाठी संबंधित शिक्षकांचा हक्क ( Not a Right ) असणार नाही .

तसेच ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतर जिल्हा बदली हवी आहे , अशा शिक्ष्कांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या 31 मे अखेर किमान 5 वर्षे सलग सेवा होणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर संबंधित शिक्षक कर्मचारी हा कायम सेवेत ( Permanent ) असणे आवश्यक असणार आहे . सदर पाच वषांच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाणार आहे , विशेष संवर्ग भाग व भाग 2  मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा 03 वर्षांची असणार आहे .

सविस्तर सुधारित बदली धोरण शासन निर्णय पाहा

विशेष शिक्षक भाग संवर्ग 1 मध्ये पक्षघाताने आजारी कर्मचारी , दिव्यांग कर्मचारी , हृद्य शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी , एकच मुत्रपिंड सुरु असलेले कर्मचारी , यकृत प्रत्यारोपण झालेले कर्मचारी , कॅन्सरने आजारी कर्मचारी , मेंदूचा आजार झालेले कर्मचारी , थॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालन करणारे कर्मचारी , माजी सैनिक तसेच आजी / माजी व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी  / विधवा असलेल्या महिला कर्मचारी , विधवा कर्मचारी , कुमारिका कर्मचारी , परित्यक्ता / घटस्फोटित महिला कर्मचारी , वयाने त्रेपन्न वर्षे पुर्ण झालेले कर्मचारी , स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातु असणाऱ्या कर्मचारी यांचा समावेश होतो .

तर विशेष शिक्षक संवर्ग भाग 2 मध्ये – जर सध्या पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग – 2 शिक्षकांचा दर्जा प्राप्त होणार आहे .

सर्वसाधारण संवर्ग – सर्वसाधारण संवर्गांमध्ये अर्जदारांची आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे . ज्येष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवाज्येष्ठता विचारात घेण्यात येणार आहेत .सेवाज्येष्ठता दिनांक एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल , तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव विचारात घेवून जे आद्याक्षर प्रथम येते त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्याचे धोरण ठरविण्यात आलेले आहेत .

बदली शासन निर्णय

आपण जर शासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेंशन धारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *