mumbai : म्हाडा व सिडको या प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण गृहनिर्माण संस्था असून या संस्थांच्या अंतर्गत देशभरातील नागरिकांना अगदी परवडणाऱ्या दरामध्ये घर उपलब्ध करून दिले जात आहेत. पुढील काही दिवसांमध्ये म्हाडाच्या पुणे यासोबतच औरंगाबाद व मुंबई अशा इत्यादी शहरांमध्ये मोठी सोडत काढण्यात येईल.
या कारणामुळे विविध उत्पन्न गटामधील नागरिकांना आता स्वतःचे घर घेता येणार आहे. म्हाडाच्या कोकण महामंडळ अंतर्गत कोकण विभाग व परिसरामध्ये जवळपास साडेचार ते पाच हजार घरांची सोडत काढली जाईल (mhada lottery registration). त्यामुळे आजच्या लेखांमध्ये म्हाडाच्या सोडती संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
याबाबत आता असे वृत्त समोर आले आहे की, माढा अंतर्गत कोकण महामंडळाच्या माध्यमातून जवळपास पावणे पाच हजार घरांची सोडत प्रक्रिया ही काढण्यात येणार असून, सर्व नागरिकांना परवडणारी घरे ही स्वस्त किमतीत खरेदी करायची ही सुवर्णसंधी आहे (mhada lottery mumbai). विशेष भाग म्हणजे या सोडते मध्ये सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 20 टक्के घरांच्या सुद्धा समावेश झाला आहे. यावर्षी दहा मे ला म्हाडा अंतर्गत कोकण मंडळाचे सोडत प्रक्रिया पूर्ण झाली होती…
यामध्ये आता काही घरांची विक्री अजूनही झाली नाही. म्हणून विक्री न झालेल्या घरांचा सुद्धा या सोडते मध्ये धारा विभाग अंतर्गत समावेश केला आहे (mhada lottery registration last date 2023). यासोबतच विविध योजनांच्या अंतर्गत घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोबतीचे वेळापत्रक आहे ते निश्चित केले असून आता 11 सप्टेंबर रोजी या लॉटरीची जाहिरात प्रकाशित होईल व त्या दिवसापासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल.
या ठिकाणी आपण तपशीलवार माहिती जाणून घेतली तर, सर्वसाधारणपणे 9 लाख 80 हजार रुपयात म्हाडाचे घर आपल्याला खरेदी करता येणार असून 20 टक्के योजनेमधील 414 घरी ही पनवेल मध्ये गोदरेज प्रकल्प अंतर्गत असणारा असून त्यांचा देखील यामध्ये समावेश झाला आहे. विशेष भाग म्हणजे डोंबिवली या ठिकाणी सुद्धा असलेल्या 621 घरांचा समावेश याच सोडतीमध्ये केला आहे.
घरांच्या क्षेत्रफळानुसार किती किंमत ग्राह्य धरली जाईल;
म्हाडाच्या या सोडती अंतर्गत विविध क्षेत्रफळाच्या घटकांचा यामध्ये समावेश केला आहे. आता यामध्ये सत्तावीस चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या घराची किंमत ही 13 लाख रुपये असणार आहे (mhada lottery result 2023). यासोबतच 28 चौरस मीटर क्षेत्रफळ असेल तर घराची किंमत 14 लाख रुपये असेल, त्यासोबतच अल्प प्रवर्गातील जवळपास चारशे आठ घरांचा समावेश झाला असून घरांचे क्षेत्रफळ हे 43 ते 44 चौरस मीटर इतके निश्चित केले आहे सर्वसाधारणपणे 22 लाख 70000 रुपयात नागरिकांना अशी घरे मिळतील.
सर्वात जास्त घरे या ठिकाणी असतील;
म्हाडाच्या या सोडती अंतर्गत जे काही अत्यल्प गटामधील घर असतील ते सर्वात स्वस्त असणार आहेत आणि ही घरे वसई मधील मौजे गोखिरवरे या ठिकाणी असणार आहेत. या घरांची किंमत ही 9 लाख 80 हजार रुपये इतकी असेल (cidco maharashtra lottery). या ठिकाणी सर्वात स्वस्त घरांची उपलब्धता होते परंतु सध्या त्या ठिकाणी दोनच घरे उपलब्ध आहेत. यासोबतच मौजे वडवली या ठिकाणी आपल्याला 203 घरी उपलब्ध असलेले दिसतील या घरांची किंमत ही 19 लाख रुपये इतके असणार आहे. सोडतीमध्ये सर्वात जास्त महागडी घरे ही विरार बोळिंज या ठिकाणी आहेत आणि या घरांची गंमत 41 लाख रुपये इतकी आहे.