लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतन त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन देयक अदा करणे संदर्भात राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति हे एक शासन परिपत्रक राज्य शासनाकडुन दि.21 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सन 2023 -24 या आर्थिक वर्षातील माहे ऑगस्ट 2023 या महिन्याच्या वेतन व भत्ते तसेच निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहुन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य ,महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदानित ,तसेच जिल्हा परिषदांनी चालवलेल्या प्राथमिक शाळा सहाय्य अनुदाने या लेखाशीर्षाखाली सदर ज्ञापनाद्वारे एकुण 12,89,2458/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात येत आहे .
सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली वेतन व निवृत्तीवेतनाची रक्कम खर्च करण्यास राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अनुमती देण्यात आली आहे .सदरची निधी ही महाराष्ट्र विनियोजन ( लेखानुदान ) अधिनियम 2023 अंतर्गत वितरीत करण्यात येत आहे .
राज्य शासनांच्या सदर शासन परिपत्रकांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यांतील पेन्शन देयक विहीत वेळेमध्ये सादर होणार आहेत .
या संदर्भातील राज्य शासनांकडून दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी अथवा सेवानिृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !