Spread the love

पेन्शन योजना : सेवानिवृत्तीनंतर अनेकांना पेन्शनची टेन्शन असते , परंतु आता नागरिकांना आता पेन्शनचे टेन्शन कमी होणार आहे , ज्यांमध्ये आपल्या ग्रुतवणुकीनुसार 50 हजार पर्यंत पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे , होय राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक केंद्र सरकारची पेन्शन योजना असून ही पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल लागु आहे . परंतु या पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देत नाही , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून या पेन्शन योजनांचा विरोध केला आहे .

परंतु खाजगी नोकरी करणारे कर्मचारी ,डॉक्टर , व्यवसायीक , सामान्य नागरिक देखिल आता या योजनांमध्ये टायर – 2 मध्ये गुंतवणुक करु शकणार आहेत . आपल्या गुंतवणुकीच्या प्रमाणानुसार सेवानिवृत्तीनंतर कमाल 50 हजार रुपये पर्यंत पेन्शनचा लाभ घेवू शकणार आहेत . राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील जमा रक्कमेवर 50,000/- कर सवलतीचा लाभ मिळेल .

त्याचबरोबर अटल पेन्शन योजनांमध्ये सामान्य नागरिक / असंघटीत कामगार गुंतवणुक करुन सेवानिवृत्तीनंतर  ( वयाच्या 60 वर्षानंतर ) विशिष्ट रक्कमेचा पेन्शन म्हणून लाभ प्राप्त करु शकणार आहेत . ही पेन्शन योजना सामान्य जनतेसाठी तयार करण्यात आली असल्याने , वयाच्या 60 नंतर कमाल 5000/- प्रतिमहा पेन्शन मिळेल . यांमध्ये सामान्य नागरिकांनी केलेली गुंतवणुकीच्या 50 टक्के हिस्सा केंद्र सरकारकडून जमा करण्यात येणार आहे .या योजनेला लाभ घेण्यासाठी आपले खाते असणाऱ्या बँकेला अथवा आपल्या जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा .

त्याचबरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत एकदाच सिंगल प्रिमियवर प्रतिवर्ष 50 हजार रुपये इतके पेन्शन रक्कम मिळणार आहे . याकरीता 10 लाख रुपये इतका सिंगल प्रिमियम भरावा लागणार आहे , तर प्रिमियम भरल्यानंतर दुसऱ्या वर्षांपासून पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे , शिवाय प्रिमियमची रक्कम परत देखिल घेता येणार आहे .प्रिमियमची सिंगल रक्कम परत घेतल्यानंतर पेन्शन बंद होईल .

अशा प्रकारे वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची टेन्शन कायमची मिटविण्यासाठी वरीपैकी एका पेन्शन योजनांमध्ये गुंतवणुक करुन उतार वय सुरक्षित करावेत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *