Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सध्या देशामध्येच नव्हे तर , संपुर्ण जगाचे लक्ष हे भारताच्या चंद्रयान – 3 मिशनकडे लागले आहे . नुकतेच रशियाने चंद्रावर पाठविलेले लुना – 25 हे यान क्रॅश झाले आहे , यामुळे रशियाला या मोहिमेमध्ये मोठे अपयश मिळाले आहे .

भारताचे चंद्रयान – 3 चंद्राच्या अगदी जवळ असून , चंद्राच्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला असून आता चंद्राचे अंतर केवळ 150 कि.मी आहे . चंद्रयान – 3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग करणार होते , परंतु इस्त्रोने लँडिंगची तारिख वाढविली असून , आता चंद्राचे चंद्रावर दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी लँडिंग होणार असल्याचे इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहेत होते .

परंतू आता इस्त्रोने पुन्हा एकदा नियोजन मध्ये बदल करुन सेफ लँडिंग साठी दि.23 ऑगस्ट 2023 वेळ 17.20 हिच वेळ निर्धारित केली आहे .

चंद्रयान – 3 हे चंद्राच्या खुपच जवळ गेला असून , चंद्रयानाकडून चंद्राचे एकदम जवळचे फोटो रिलिज करण्यात येत आहेत . यामुळे चंद्राचे सदर फोटोमधून जवळचे दर्शन होत आहे .सदर चंद्रयान – 3 ने रिलिज केलेले लेटेस्ट फोटो इस्त्रोकडून प्रकाशित करण्यात आलेले असून सविस्तर फोटो खालील प्रमाणे पाहु शकता ..

चंद्रयान – 3 मिशन अंतर्गत यानाची सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी यानांमध्ये LHDAC कॅमेरा लावण्यात आलेले आहेत .या कॅमेराची निर्मिती खास वापरासाठी अहमदाबाद येथून बनविण्यात आलेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *