लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2023 च्या वेतनाकरिता निधी वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023 – 24 आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्या संदर्भात आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बालसेवा योजना आणि केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते .
सन 2020-24 आर्थिक वर्षाकरिता पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2023 च्या वेतनाकरिता एकूण 53 कोटी तेरा लक्ष अठरा हजार रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे .
सदर निधीसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहेत , त्यांच्याकडे हा निधी सुपूर्त करण्यात येत आहे . त्यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच यासंदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाऱ्याचे प्रत्यायोजन यांचे काटेकोर पालन करणार यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !