Spread the love

शासन राजपत्र : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांस देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रस्तावित कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेले आहेत . सदर सुधारणा महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियम 1981 यांमध्ये सुधारणा करुन सदर मसुदा आता दिनांक 03 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येईल .

सदरची वेतश्रेणी ही राज्यातील खाजगी शाळांमध्ये कार्यरत कर्मचारी यांना देण्यात येत असणारी असुधारित वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करुन दिनांक 01 जानेवारी 2016 पासूनच सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांकडून दिनांक 03 मार्च 2023 रोजी राज्याचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने सुधारित वेतनश्रेणी बाबतचा शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर सुधारित वेतनश्रेणी ही दिनांक 01.01.2016 पासूनच सुधारित करण्यात येत असल्याने सदरचा वेतन फरक देखिल लागु करण्यात येणार आहेत . पदनिहाय असुधारित वेतनश्रेणी व सातव्या वेतन आयोगानुसार ( सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर ) सुधारित वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर बाबतचा सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

सुधारित वेतनश्रेणी शासन राजपत्र

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक  / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *