सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी : जन्म तारीखेची नोंद- जन्म तारीखेची नोंद घेताना तीची कशाच्या आधारे पडताळणी केली त्याचा उल्लेख करावा. जन्म तारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखाने स्वाक्षरी करावी 2. धर्म , जात लिहीत असताना मुळ जात नमुद करावीत , त्याचबरोबरच आपण ज्या प्रवर्गातून (संवर्गातून ) सेवेस लागले आहेत , त्याचाही उल्लेख करण्यात यावेत …
शासन सेवेत रुजू होतेवेळी असणारी शैक्षणिक अर्हता तसेच त्या मध्ये झालेले वाढ याचीही नोंद सेवापुस्तक मध्ये घ्यावेत तसेच त्यात वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेख करुन तशी नोंद साक्षांकित करण्यात यावीत .वडिलांचे नाव व मुळ राहण्याचे ठिकाण , वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद इ.नोंदी करण्यात यावीत ..
*प्रथम नियुक्तीनंतरच्या नोंदी- प्रथम नियुक्ती आदेश , प्रथम रुजु दिनांक ,प्रथम नियुक्ती स्थायी / अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग ज्या पदावर नियुक्ती ते पदनाम व वेतन श्रेणी ,स्वग्राम घोषणापत्राची नोंद ,गट विमा योजना सदस्य नोंद व कपात केलेली रक्कम ,अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम ,मराठी भाषा परिक्षा उत्तीर्ण / सुट आदेश नोंद ,हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण / सुट आदेश नोंद ,
तसेच संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण झाल्याची सुट नोंद ,चारित्र्य पडताळणी नोंद (विभाग प्रमुखाच्या सहमतीने) स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद ,जात पडताळणी बाबतची नोंद ,टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद ,भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद , DCPS / NPS खाते क्रमांक नोंद , विभागीय परिक्षा उत्तीर्ण अथवा सुटीची नोंद ,परिविक्षाधीन कालावधी समाप्त करुन नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद ,छोटे कुटुंब प्रमाणपत्र ,अपंगांसाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंगत्वाबाबतची विहित वैधता प्रमाणपत्र
*निष्ठेचे शपथपत्र कर्मचा-याकडून घेऊन ते साक्षांकित करुन सेवाभिलेख्यात / सेवापुस्तकात चिकटावे – (शासन परिपत्रक सा.प्र विभाग दि.11.9.2014 व दि.6.10.2015)
** नियमित बाबी / घटना – वार्षिक वेतनवाढ : वार्षिक वेतनवाढ मंजुरी झाल्यानंतर त्याची नोंद ही सेवा पुस्तक मधील रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी करण्यात यावीत ..बदली झाली असल्यास बदली आदेश कार्यमुक्तीचा आदेश नवीन पदावर रुजु झाल्याचा दिनांक, इत्यादी तपशिलाची नोंद जेथे पदग्रहण अवधी अनुज्ञेय असेल तेथे पदग्रहण ,पदोन्नती / पदावन्नतीच्या आदेशाची नोंद , पदोन्नती / पदावन्नतीच्या पदावर रुजु दिनांकाची नोंद..
सेवापुस्तकातील महत्त्वाचे आक्षेप : 1. सेवापुस्तकातील रजा लेखा अपूर्ण असणे. 2. सेवापुस्तकातील रजा लेखा चुकीचा असणे, 3. सर्व्हिस बुक मध्ये मराठी/हिंदी भाषा परिक्षा सुट आदेश यांची नोंदी नसणे. 4. वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे.5. वेतन आयोगाची वेतननिश्चिती मधील आक्षेप. 6. चारित्र्य पडताळणी झाल्याची नोंद नसणे, 7. स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे. 8. राज्य शासनाच्या दि.05.05.2010 रोजीच्या GR नुसार आवश्यक प्रकरणात वेतननिश्चिती सुधारीत न केल्याने येणारी वसुली तसेच सदर वसुली रकमांची नोंद सर्व्हिस बुक मध्ये नसणे ..
9. स्वग्राम घोषित केल्याची नोंदी नसणे. 10. गटविमा योजना वर्गणी कपात रक्कमांची नोंद नसणे 11. टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण नौद नसणे, 12. दर पाच वर्षानंतर सर्व्हिस बुक मधील पहिल्या पानावरील नोंदी अपडेट न करणे 13. सेवा पडताळणी नोंद नसणे. 14. शा. नि. वित्त विभाग दि.1.9.2015 नुसार सुधारित वेतन संरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना कर्मचारी यांचे वेतन कमाल टप्पाचे पुढे जात असेल तर अशा प्रकरणी ते वेतन त्या कमाल टप्पावर सिमीत न करणे
15. सेवाप्रवेशोत्तर परिक्षा उत्तीर्ण न होताच वेतनवाढीचा लाभ घेणे 16. संगणक अर्हता परीक्षा विहित दिनांकास उत्तीर्ण न झाल्याने वेतनवाढीचे अतिप्रदान 17. पदोन्नतीची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे 18. आश्वासित प्रगती योजना लाभ हा चुकीच्या वेतश्रेणी मध्ये होणे 19. एकाकी पदास ग्रेड वेतन चुकीचा अदा केल्याने अतिप्रदान
20. एकस्तर पदोन्नती क्षेत्रासाठी एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे 21. एकस्तर पदोन्नती चुकीची झाल्याने होणारे अतीप्रदान 22. एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती एकस्तर वरुन एकस्तर योजनेत केल्याने अतिप्रदान 23. आश्वासित प्रगती योजना मंजुर असतांना एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत वेतन अदा केल्याने अतिप्रदान
24. रजा लेखा चुकीचा लिहिल्याने रजा रोखीकरणाचे अतिप्रदान 25. विहित नामनिर्देशन / प्रमाणपत्र व तत्सम नोंदी न घेणे 26. पदोन्नती / आश्वासति प्रगती योजनेचा विकल्प मंजुर नसतांना तो विचरत घेवून वेतननिश्चीती केल्यामुळे अतिप्रदान
सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वाचे दस्तावेज : शक्यतो सर्व महत्त्वाचे आदेश / प्रमाणपत्र सेवापुस्तकात लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध होतात, जसे वैद्यकीय प्रमाणपत्र , जात वैधता प्रमाणपत्र , पुढीलप्रमाणे प्रमाणेची विविध नामनिर्देशन– i. GIS ii. GPF iii.Pension iv.DCRG V.NPS vi. DCPS vii.कुटुंब प्रमाणपत्र VILL.अपघात विमा
4. वेतन निश्चिती (वेतन आयोग / पदोन्नती / इतर) 5. विकल्प ( option) Form 6. ज्यादा रक्कम अदायगी वसुलीचे हमीपत्र 7.वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशिल, तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक व दिनाकासह 8. चारित्र्य प्रमाणपत्र 9. MSCIT / तत्सम प्रमाणपत्र 10. नाव बदललेले असले तर त्याबाबतचे राजपत्र 11. स्वग्राम घोषित आदेश 12. GIS बद्दल आदेश
13. स्थायित्व प्रमाणपत्र आदेश 14. परिविधाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश 15. मराठी / हिंदी परिक्षा पास / सुट आदेश 16. विभागीय परीक्षा उत्तीर्ण / सूट आदेश 17. शा. परिपत्रक वित्त विभाग दि.20.1.2001 नुसारचे विवरणपत्र
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !