लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थकि व सामाजिक सुरक्षा प्रदान होण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेली समितीने तयार करण्यात आलेल्या अहवालास मुहुर्तच मिळत नाही , यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा प्रतिक्षा कालावधी वाढत आहे .
जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनांकडून गठीत अभ्यास समितीला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला होता . सदर गठीत समितीला राष्ट्रीय पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन ओल्ड पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणेबाबत अहवाल तयार करण्याचे कामकाज सोपविण्यात आला आहे .
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार तीन महिन्यांचा कालावधी हा दिनांक 14 जुन रोजी संपुष्टात आला होता , त्यानुसार राज्य शासनांने दिनांक 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर राज्यातील सत्तेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनेच आगमन केल्याने परत सदर अहवालास दिनांक 14 जुन पासून आणखीण दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली यानुसार दोन महिन्याचा कालावधी हा दिनांक 14 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे , तरी देखील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत कोणतेही सकारात्मक निर्णय घेतले जात नाहीत .
राज्य कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च 2023 रोजी राज्यांमध्ये बेमुदत संप पुकारला होता , सदर संप मागे घ्यावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली होती , यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येणारी पेन्शन योजना लागु करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते . या लेखी आश्वासनांचे भान राज्याचे मुख्यमंत्री यांना असले तरी या निर्णयाला मुहुर्त कधी लागणार याकडे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .
कर्मचाऱ्यांनी संप करुन पाच महिने झाले तरीही निर्णय होत असल्याने , आता राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे .जर राज्य शासनांने जुनी पेन्शन योजना लागु नाही केली तर , आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुकींमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या विरोधात कर्मचारी मत करणार असल्याची माहिती समोर येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !