Bank Cheque Signature Rules : आजच्या लेखामध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर तपशीलवार अशी माहिती घेणार आहोत. कारण ही माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कित्येकदा आपण बँकेमध्ये गेल्यानंतर चेकच्या मागे सही करतो. परंतु आपण चेकच्या मागे सही का करतो? बँक आपली सही चेकच्या मागे का घेते? हे आपल्याला माहीत नसते. एखाद्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल, तर कोणताही व्यवहार करायचा असल्यास तुम्ही त्या बँकेमध्ये जाता आणि चेकच्या माध्यमातून व्यवहार करता. अशावेळी आपण चेकच्या मागे कोऱ्या पानावर सही करतो. तर असे का केले जाते? चला पाहूया.
मित्रांनो चेक हाताळत असताना चेकवर आपण संपूर्ण डिटेल्स अगदी बिन चुकता भरतो. त्यावर आपले नाव, आजची तारीख, बँक खाते नंबर, रक्कम इत्यादी माहिती व्यवस्थित भरतो आणि चेकवर सही करतो. पुन्हा एकदा आपण चेकच्या मागे आपली सही करतो (Bank Rules and regulations). चेकच्या मागे जी सही करतो त्याचा नक्की हेतू काय आहे? याविषयी आज आपण माहिती बघूया…
राज्य कर्मचाऱ्यांचे मुंबई या ठिकाणी या 15 मागण्यांसाठी एक दिवसीय भव्य राज्यव्यापी आंदोलन; पहा सविस्तर;
Bank Cheque Signature Rules
सध्या बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. परंतु काही व्यवहार पार पाडण्यासाठी बँकेमध्येच जावे लागते. जसे की चेक थांबवणे, चेक जमा करणे, यासोबतच बँके मधून पैसे काढून घेणे, अशावेळी कित्येकदा आपण व्यवहार करत असताना चेकच्या मागे सही करतो (Bank Rules for customers). परंतु असे का करतो हे आपल्याला माहीतच नसते.
चेकच्या समोर सही केल्यानंतर मागे देखील सही का करायची असते? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असणार. तर कोणत्याही खातेदार व्यक्तीला तिच्या स्वतःच्या बँक खात्यामधून पैसे काढण्याकरिता जो काही चेक असतो तो जमा करण्याची मान्यता असते.
चंद्रयानाद्वारे चंद्राच्या कक्षेतील टिपलेले अद्भुत असे छायाचित्र! येथे क्लिक करून सर्व फोटो पहा;
चेक दिल्यानंतर कॅशियर त्या व्यक्तीला चेकवर लिहिलेली रक्कम प्रदान करतो. हे पैसे घेऊन तो व्यक्ती आपल्या पुढील कामावर जातो (Bank Rules in india). ही झाली आपण जी नेहमी बघतो ती बाजू. आता दुसरी बाजू तुम्हाला माहित आहे का? जर तीच व्यक्ती काही कारणास्तव थोड्या वेळाने परत आली आणि कॅशियर ला म्हणाली माझे टोकन खराब झाले आहे असे काहीतरी वेगळे कारण देत पैसे काढण्यासाठी मागणी केली तर अशावेळी कॅशर कडे पैसे प्रदान करण्याकरिता कोणताही पुरावा नसल्यास काय होईल.
बँक चेक स्वाक्षरी नियम;
मित्रांनो अशा वेळी चेकच्या मागे जी सही केलेली असते ती मोठी मदत करू शकते. बँकेने जाहीर केलेल्या नियमानुसार तयार केलेल्या काही विशिष्ट सुरक्षा व्यवस्था आहेत. त्यापैकीच ही एक आहे. कारण यामधून कोणतीही फसवीगिरी होत नाही. तोकन घेतल्यानंतर जर त्या व्यक्तीच्या माध्यमातून हरवले असेल तर त्यावेळी दुसरी व्यक्ती पैसे घेण्याकरिता येत असते.
अशा परिस्थितीमध्ये त्यांना मूळ खातेधारकांची सही जमत नसते आणि कित्येकदा ही फसवणूक पकडली गेली आहे (Bank Rules in marathi). अशावेळी पाठीमागच्या बाजूस तुमच्याकडून सही घेतली जाते जेणेकरून कोणतेही फसवू नको किंवा कोणताही चुकीचा मार्ग तयार होऊ नये.
बेअरर चेक रक्कम काढणारा जो कोणी खातेदार असेल त्या व्यक्तीची स्वाक्षरी त्याच्याकडे असलेल्या पॅन कार्ड वर जी स्वाक्षरी आहे त्याप्रमाणे साम्य बघितले जाते. असे असेल तर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जातात. यासोबतच त्या व्यक्तीचे स्वतःचे पॅन कार्ड क्रमांक सुद्धा घेतले जात आहे. बँकेच्या आणि खातेदार व्यक्तींच्या सुरक्षितेसाठी बँकांनी हा नवीन नियम लागू केले आहेत…