लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य वतीने राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध 15 मागण्यांसाठी दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी एक दिवसीय भव्य राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत . यांमधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत .
सदर वरील कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे शालेय वेळापत्रक पुर्वी प्रमाणे सकाळी 11 ते 05 या वेळेत करण्यात यावेत तसेच जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी तसेच केंद्र सरकारप्रमाणे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावेत . त्याचबरोबर शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करण्यात यावा . नविन आकृतीबंध रद्द करुन विलोपित पदे ही पुनर्जिवित करण्यात यावेत त्याचबरोबर रोजंदारी यांमध्ये संवर्ग क व ड व कंत्राटी कला , क्रिडा व संगणक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावेत तर बाह्य यंत्रणेद्वारेची भरती कायम स्वरुपीची रद्द करण्यात यावी .
कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे 10-20-30 वर्षांची त्रिस्तरीय वेतनश्रेणी शिक्षक संवर्गांना लागु करण्यात यावी . तसेच इयत्ता 10 वी व 12 वी चे निकाल 80 टक्के पेक्षा कमी लागल्यास होणारी वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही तात्काळ रद्द करण्यात यावी .
आदिवासी विकास विभागातील मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात यावा , तर अधिक्षक व अधिक्षिकांना सहाय्यक पदे निर्माण करण्यात आलेली आहेत , त्याची अंमलबजावणी करण्यात यावी .ग्रंथपाल पदांना सुधारित वेतनश्रेणी त्याचबरोबर उन्हाळी व दीर्घ सुट्टीचा लाभ मिळावा . तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीचे सेवा प्रवेश नियम तयार करुन पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात यावीत ..
तसेच वरीष्ठ वेतनश्रेणी नंतर एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ पुढे नियमित चालु ठेवण्यात यावेत तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी नंतर एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ पुढे नियमित चालु ठेवण्यात यावेत . नागपुर विभागांमध्ये बद पडलेल्या अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावेत ..तसेच आदिवासी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नियत कालिक बदल्या ग्राम विकास विभागाप्रमाणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावेत .
अशा विविध 15 प्रमुख मागणीसाठी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आझाद मैदान , मुंबई येथे एक दिवसीय भव्य राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !