Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे विविध विभागांकडून सेवा विषयांचे प्रस्ताव हे सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेकरीता सादर करण्यात येत असतात . जर सदर प्रस्तावामधील परिपुर्णता नसल्यास सदर प्रस्ताव संबंधित विभागास परत करण्यात येत असतो , ज्यामुळे सदर प्रस्ताव पुर्ण होण्यासाठी विलंब लागला जातो .

सदरचा विलंब टाळावा याकरीता सामान्य प्रशासन विभागांकडून प्रस्ताव पुरीपुर्ण सादर करण्यात यावा म्हणुन विभागाच्या अखत्यारीतील सेवा विषयक कार्यासनांकडून तपासणी सुची ( Checklists ) तयार करण्यात आलेली आहे , सदर तपासणी सुची एकत्रितपणे उपलब्ध व्हावी याकरीता सर्व तपासणीसुचींची संकलन करुन एकत्रित पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे .सदर तपासणी सुचींचा वापर करुन प्रस्ताव परिपुर्ण करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागांकडून देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये अनुंकपा नियुक्तीची प्रकरणे , मंत्रालय व बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील गट क मधील लिपिक टंकलेखक या पदावर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबतचे प्रस्ताव , भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रस्ताव , भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे घरबांधणी अग्रीमावरील व्याज व सेवानिवृत्ती वेतनादी लाभ , भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशीची प्रकरणे .

  • विभागीय चौकशी सुरु करण्यासंबंधची प्रस्ताव
  • शिक्षा देण्यासंबंधीचे प्रस्ताव
  • निलंबन कालावधीचे नियमन व त्या कालावधीसाठी प्रदान करावयाच्या वेतन भत्यांसबंधीचे प्रस्ताव
  • निलंबन आढावा समितीसमोर सादर करावयाचे प्रस्ताव
  • विभागीय चौकशी प्रकरणी मुदवाढीसाठीचे प्रस्ताव
  • सेवा प्रवेश नियमाचे प्रस्ताव
  • निवडसूची / तदर्थ पदोन्नतीचे प्रस्ताव
  • विभागीय संवर्ग वाटप बदलाचे प्रस्ताव
  • मानिव दिनांकाचे वाटप
  • विदेशात प्रशिक्षण / दौऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी करताना तपासवयाचे मुद्दे
  • आस्थापना मंडळासमोर सादर करावयाचे प्रस्ताव
  • स्थायित्व प्रमाणपत्र मिळणेबाबत
  • सह / उप सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे प्रस्ताव
  • सरळसेवा कक्ष अधिकाऱ्यांच्या परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत प्रस्ताव
  • विभागीय परीक्षेसंबंधी प्रस्ताव

अशा प्रस्तावांची तपासणी सुचींचे संकलन खालील पुस्तिकांमध्ये करण्यात आलेले आहेत , जेणेकरुन प्रस्तावांची छानणी करणे अधिक सोयीचे ठरणार आहेत .

सदर तपासणी सुचीची पीडीएफ PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

तपासणी सूची पुस्तिका (PDF)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *