लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची बातमी समोर येत आहेत . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबचा निर्णय लवकरच राज्य शासनांकडून होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहेत .
गठीत अभ्यास समिती लवकरच सादर करणार आपला अहवाल : राज्य शासनांकडून राज्यतील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ लागु करणेबाबत गठीत करण्यात आलेली समितीस दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी दोन महीन्यांचा वाढीव मुदवाढ संपुष्टात आल्याने लवकरच आपला अहवाल राज्य शासनांकडे सुपुर्त करण्यात येणार आहेत . या गठीत समितीने जुनी पेन्शन प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान होईल , त्या अनुषंगाने आकडेवारी संकलित करण्यात आलेली आहे .
सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्य शासनांकडून सविस्तर चर्चा विधीमंडळात करुनच जुनी पेन्शनबाबत उचित योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे .तसेच राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी मागणी म्हणजे केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य सरकारने कर्मचारी हिताचा घेण्यात आलेला सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे लाभ लागु केले जाणार आहेत .
मागील महिन्यांत महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये , सेवानिवृत्तीचे वय वाढविणे बाबत सकारात्मक चर्चा झाली असून , या संदर्भाचा प्रस्ताव मुख्य सचिव यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सादर करण्यात आलेला आहे .
आगामी वर्षांमध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना खुष करण्यासाठी राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देण्याचा शब्द निश्चितच पाळतील तसेच सेवानिवृत्तीचे वय हे केंद्राप्रमाणे 60 वर्षे करतीलच अशी कर्मचाऱ्यांची आशा आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !