लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतर , वेतनाचा लाभ चालु ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .परंतु यामध्ये काही अटी व शर्तींचे पालन सदर विधवा पत्नीस विवाहानंतर करणे आवश्यक असणार आहेत .
राज्य शासनांची सेवा करत असताना हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतर देखिल त्यास वेतनाचा लाभ लागु केले जाणार आहेत . मात्र पुनर्विवाहानंतर संबंधित हुतात्मा कर्मचाऱ्यांच्या वयोवृद्ध आई- वडील त्याचबरोबर अविवाहीत दिव्यांग भाऊ – बहीण तसेच अल्पवयीन पाल्य यांच्या पालन पोषण करण्याची संपुर्ण जबाबत सदर पत्नीने घेणे आवश्यक आहे .
यांमध्ये दरोडेखोरांविरुद्ध कारवाई तसेच कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेले अधिकारी तसेच नक्षवादी / दहशतवादी कारवाई करत असताना ,हुतात्मा झालेल्या विधवा पत्नीला राज्य शासनांकडून सदर हुतात्मा झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्यात येते .
परंतु सदर विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतर सदर वेतन बंद करण्यात येत होते , यामुळे राज्यातील बऱ्याच हुतात्मा पत्नी व त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रारी राज्य शासनांकडे सादर केल्या , व सदर नियमांमध्ये सुधारण्याची मागणी केल्यानंतर राज्य शासनाने सदर हुतात्मा झालेल्या पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतर देखिल नियमित वेतन चालु ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .
या निर्णयामुळे हुतात्मा झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुनर्विवाहानंतर देखिल नियमित वेतनाचा लाभ अनुज्ञेय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !