लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : केंद्रीय वित्त मंत्री श्रीम.निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करणेबाबत , वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्याची घोषणा केली होती .
या गठीत समितीकडून सरकारी कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजनांमध्ये बदल करणेबाबत कर्मचाऱ्यांच्या नेशनल काउंसिल सोबत चर्चा करण्यात आली आहे . यांमध्ये विविध कर्मचाऱ्यांच्या बाजुचे विविध मुद्दे चर्चेले गेले आहेत .या संदर्भात राज्यसभेमध्ये एकाने उपस्थित केलेल्या प्रश्नाला अनुसरुन केंद्रीय वित्त राज्यमंत्री यांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिलेले आहे .
राज्यसभेमध्ये अनेक सदस्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनाची समीक्षा करणेबाबत गठीत समितीच्या अहवालाबाबत विचारणा केली असता , केंद्रीय वित्त राज्यमत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सांगितले कि ,सदर गठीत समितने कर्मचाऱ्यांच्या नेशनल काउंसिल ( ज्वाइंट कंसलटेटिव मशिनरी ) च्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे .
चर्चेनंतर गठीत समिती अभ्यास करत असून , सरकारी कर्मचाऱ्यांना NPS पेन्शन योजनेंमध्ये पेन्शन देण्यासाठी NPS च्या सध्याची असणारी चौकट आणि रचना यांमध्ये बदल करण्याची आवश्यक असल्याची यावेळी नमुद करण्यात आले .यांमध्ये बदल करत असताना सदर समिती सरकारचे बजेट विचारात घेवूनच , पुढील निर्णय घेईल , असे यावेळी वित्त राज्य मंत्री यांनी उत्तर दिले आहेत .
सदर गठित समिती ही केंद्रीय वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे .याशिवाय डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग चे सचिव तसेच पीएफआरडीए चे चेयरमैन देखिल या समितीचे सदस्य आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !