लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जुनी पेन्शन व घरभाडे भत्ता मध्ये वाढ करणेबाबतचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात येणार आहेत .
कोकण विभागाचे शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जुनी पेन्शन संघटना पालघर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जुनी पेन्शन तसेच व्होट फॉर ओल्ड पेन्शन मोहिमे बाबन निवेदन देण्यात आले .यावेळी आमदार मा.ज्ञानेश्वन म्हात्रे यांनी सांगितले कि , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन ( Old Pension ) मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशिल राहीन , यासाठी वरिष्ठ सभागृहांमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती दिली .
त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगामधील दुसरा व तिसरा हप्ता , तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये कपात करण्यात येणारी कर्मचाऱ्यांच्या हिश्याची रक्कम प्रत्येक महिन्याला NSDL कडे वर्ग करणे , तसेच राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन तसेच इतर लाभ मिळवून देणे ..
त्याचबरोबर वसई – विरार शहर पालिका क्षेत्रांमधील सरकारी – निमसरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) 18 % ऐवजी 27% मिळावा याकरीता , स्वत : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विधीमंडाळांमध्ये पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे .
यावेळी कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावेत , याकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पालघर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !